रॅलीच्या माध्यमातून कुष्ठरोग जनजागृती

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (दि.५) कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, माणुसकी प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्था यांच्या सहयोगाने तसेच कर्मचारी व स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. प्राची नेहुलकर (रायगड–अलिबाग), माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हूलवान, जन शिक्षण संस्थान अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, जन शिक्षण संस्थान संचालक डॉ. विजय कोकणे, अवैद्यकीय अधिकारी भगवान जाधव यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नर्सिंग स्टाफ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव या जनजागृती रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

ही रॅली सिव्हिल हॉस्पिटल, अलिबाग येथून सुरू करण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना कुष्ठरोगाबाबत जनजागृती, गैरसमज दूर करणे, वेळेवर तपासणी व उपचाराचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीच्या माध्यमातून समाजात कुष्ठरोगाबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यात यश आले.

Exit mobile version