। अलिबाग । वार्ताहर ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणार्या मोरबे खालापूर येथे जन शिक्षण संस्थान रायगड व डॉ. जी. डी. पोळ फॉउंडेशनचे वाय. एम. टी. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिना निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमया, डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असतांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थानचे संचालक विजय कोकणे, वाय. एम. टी. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण यामगार, डॉ. श्रुतिका गायकवाड, हर्षदा मिरकुटे, आकांशा पाटील, वैदेही चौहान, रवी काळे, ज्ञानदा बेंदळे, प्रतीक्षा चव्हाण, कल्पना म्हात्रे, संजय सांगळे, सारिका सांगळे, संज्योती भोईर, सिद्धी साळुंके, मीनाक्षी पवार, शीतल पाटील व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत होते. सदर कार्यक्रम कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून पार पडला.