चला सामूहिकरित्या ग्रामविकास साधू या !

सीईओ डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

| अलिबाग | प्रतिनिधी |

शासनाकडून राबविण्यात येणार्‍या विविध शासकीय योजना आणि प्रत्यक्ष मिळणार्‍या सुविधा यातील अंतर आणखी कमी करण्यास, त्यात अधिक सुसूत्रता आणण्यास वाव आहे. यासाठी ग्रामविकास आराखडा नव्याने तयार करण्यात येत असून यासाठी अचूक माहितीचे संकलन करणे आवश्यक आहे, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी बुधवारी (दि.3) अलिबाग येथे व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील जवळपास 42 हजार गावांमध्ये (यात अलिबाग तालुक्यातील बेलकडे, वरसोली, वाडगाव या गावांचा समावेश) ग्रामसुविधा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यानुषंगाने ग्रामविकास या विषयाशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना याबाबत सविस्तर माहिती व्हावी, याकरिता जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांच्या संयुक्त विदयमाने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, मुंबई चे संचालक वजय आहेर, उपायुक्त (नियोजन) संजय पाटील, प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग च्या सहसंचालक सीमा जोशी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, मुंबई चे अपर संचालक (समन्वय) पुष्कर भगूरकर, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, मुंबई चे सहसंचालक (समन्वय) प्रमोद केंभावी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, रायगड जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक वृषाली माकर, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, मुंबई चे उपसंचालक (समन्वय) विजय भोपळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) शुभांगी नाखले हे मान्यवर उपस्थित होते.

जग झपाट्याने बदलत आहे. डिजिटल युगात अनेक बाबींना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे माहिती. ही माहिती अचूकपणे संकलित केल्यास योग्य प्रकारे नियोजन करता येते. केलेल्या नियोजनाप्रमाणे योजनांची अचूकपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते. म्हणूनच माहिती संकलन करणार्‍या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी संबंधित सांख्यिकी माहिती अत्यंत जबाबदारीने, अचूकपणे संकलित करावी व नोंदवावी.

डॉ.किरण पाटील, सीईओ

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, विजय आहेर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस ग्रामविकासाशी संबंधित कोकण विभागातील विविध शासकीय विभागांचे क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी, अलिबाग तालुक्यातील बेलकडे, वरसोली, वाडगाव या गावातील काही लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक पुष्कर भगूरकर यांनी केले, सूत्रसंचालन शेख यांनी तर वैशाली माकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या सांख्यिकी सहाय्यक श्रीमती पल्लवी फालक, अंकुर जाधव, गौरव भगत, अनिकेत म्हात्रे तसेच जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी परिचय देसाई, बाळासाहेब आबनावे, सहाय्यक संशोधन अधिकारी डेबे,संजय नाईक, शिंदे, लेखाधिकारी श्री.इंगळे, उपलेखापाल प्रदीप कदम, अजिंक्य तबीब, रुपेश भोईर, लेकराज शेळके, नरेंद्र गावडे नेहाली पोरे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version