| अलिबाग | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील व्यवसाय इच्छुक तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये विविध विषयातील तज्ञ मंडळींकडून व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.
मंगळवार, (दि.15) सकाळी 11 वाजता चला उद्योजक होऊया या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयांतर्गत कृषी क्षेत्रातील नव उद्योजक श्री.हेमंत कोंडीलकर हे सेंद्रिय खत निर्मितीतून स्वयंरोजगार या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र सगळ्यांसाठी खुले असून गुगल-मीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या ऑनलाईन सत्रामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी https://meet.google.com/nad-zpkc-ugg या लिंकचा वापर करावा. तरी जिल्ह्यातील व्यवसायभिमुख तरुण, शेतकरी वर्ग, बचतगटातील महिला, कृषी क्षेत्राशी निगडीत सर्वांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.