चला व्यसनाला बदनाम करु; सचे व्यसन विरोधी अभियान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
थर्टी फस्टच्या नावाखाली मद्याधुंदतेला विरोध दर्शवित अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या रायगड शाखेने आज शुक्रवारी अलिबाग शहरातील महाविर चौकात मद्य विक्रीच्या दुकानासमोर अभिनव निदर्शने करीत चला व्यसनाला बदनाम करु हे व्यसन विरोधी अभियान केले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखालील या अभियानात शुभांगी जोगळेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी द दारुतला नव्हे तर द दुधातला अशी घोषणा देत येणार्‍या जाणार्‍यांना प्रबोधन करीत दुधाचे वाटप केले जात होते. यावेळी नितीन राऊत म्हणाले की, 31 डिसेंबर च्या दिवशी मद्याचा महापूर येतो. बरेचशे तरुण या दिवशी मद्याचा पहिला प्याला घेतात. आणि आयुष्यभर त्या ग्लासात अटकून पडतात. त्यामुळे 31 डिसेंबरला दारु न पिता दुध प्या असा आम्ही संदेश देतो. सर्वच व्यसनांपासून आपण मुक्त रहा निरोगी रहा असा आम्ही आग्रह करतो. तसेच महाराष्ट्र शासनाने यावर्षी बियर आणि सर्व लिकर बेकरी, मॉल आणि किराणा दुकानात विक्री सुरु करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही शासनाचा निषेध व्यक्त करतो.

Exit mobile version