जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य निर्णय घेऊ

उत्सुक नसलेल्या भाजपचा शिष्टमंडळात समावेश
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत ते जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या मागणीसाठी 10 सदस्यीय शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींशी संवाद साधला आणि आपल्या मागण्या पंतप्रधानांपुढे ठेवल्या. जातीनिहाय जनगणनेसाठी उत्सुक नसलेल्या भाजपचाही या शिष्टमंडळात समावेश होता. या चर्चेनंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. जातीनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मोदींनी आपल्याला योग्य निर्णय घेण्याचं आश्‍वासन दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, आम्ही सर्वांनी पंतप्रधानांची भेट घेतली. आमची जी बाजू आहे ती पूर्णपणे आम्ही पंतप्रधानांसमोर मांडली. जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही का करत आहोत हेही त्यांना पटवून दिलं आहे. या संदर्भात निश्‍चितच योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्‍वासनही पंतप्रधानांनी आम्हाला दिलं आहे.जातीच्या आधारावर जनगणना प्रत्येकाच्या हिताची आहे. अशी जनगणना कोणत्याही जातीच्या समुहाला अस्वस्थ करेल अशी चिंता करणं निराधार आहे, असं नितीश कुमार यांनी पूर्वीही अनेकदा म्हटलं आहे.

जातीची जनगणना करायची की नाही हे केंद्रावर अवलंबून आहे. आमचे काम फक्त आमचे मत मांडणे आहे. जातीनिहाय जनगणना एका जातीला आवडेल आणि दुसर्याला आवडणार नाही, किंवा कोणी नाराज होईल, असं समजू नका. ही जनगणना प्रत्येकाच्या हिताची आहे, असे नितीश कुमार म्हणाले होते. नितीश कुमार यांच्याशिवाय बिहारच्या अनेक नेत्यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. भारतात ब्रिटिश काळापासून जनगणना झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर जातींमध्ये वाद होऊ नये म्हणून ही जनगणना बंद करण्यता आली आणि त्याची जागा अनुसूचित जाती आणि जमातींच्या जनगणनेने घेतली होती.

Exit mobile version