। गोवे -कोलाड । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्ग 17 वरील सुकेळी खिंडीत तीव्र उतारावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून या खड्डयांतुन प्रवास करतांना प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कोणाचा जिव गेल्या नंतर सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदार यांना जाग येईल काय? अशा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानचे चौपदरी करणाचे काम गेली 12 वर्षापासुन सुरु असूनही या कामात अद्यापही प्रगती नाही. याउलट पावसाला संपून तीन महिने झाले तरी पावसाळ्यात रस्त्याला पडलेले मोठ मोठे खड्डे अद्यापही भरले गेले नाहीत याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत आहे.
नागोठणेकडून खांबकडे जाणारा सुकेळी खिंडीलील चढ उतारावरील रस्ता अतिशय भयानक बनला असून या रस्त्याला पडलेले मोठ-मोठे खड्डे चढ उतारावर असल्यामुळे हे खड्डे वाहन चालकांच्या चटकन लक्ष्यात येत नसल्याने येथे अपघाताचा धोका अधिकच वाढलेला आहे.या खड्ड्यातून प्रवास करतांना मणक्याचे आजार, कंबर दुखी या सारखे आजाराला प्रवासी वर्गाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्याचे काम वाढीव निधी मिळूनही का थांबला गेला आहे. एखादा कर्ता प्रवासी या खड्डयातुन प्रवास करतांना जखमी होऊन मृत्यू झाला तर त्याचे सर्व कुटूंब उद्योस्त्त होते अशा घटना ही घडलेल्या आहेत. तरी या रस्त्याचे काम पुर्ण करण्यासाठी जाग येईल काय? असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे.