। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग नजीकच्या चेहेर आणि मानी-भुते गावातून आठ फूट तर नऊ फूट अशा दोन अजगरांची सुटका करण्यात आली. चेहेर, वाघुलवाडी येथील ग्रामस्थांकडून एक अजगर जाळ्यामध्ये अडकल्याची माहिती मिळताच वाइल्ड लाइफ वॉरियर्स ऑफ अलिबागच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अजगराची सुखरूप सुटका केली.
काहीच दिवसात मानी-भुते येथून अशाच स्थितीतून आणखी एका अजगाराची सुटका करण्यात संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आले. दोन्ही अजगर जाळ्यात अडकल्यामुळे गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करण्यात आले. ह्यासाठी ठएडट, पुणे ह्या संस्थेची मोलाची मदत झाली. निरोगी व सशक्त झालेल्या अजगरांना स्थानिक वनखात्याच्या सहाय्याने नजीकच्या जंगलात सोडण्यात आले. सदर प्रक्रियेमध्ये डॉ. प्रसाद दाभोळकर, साईराज झावरे, आसिफ मलिक, अविनाश थळे, संदीप घरत ह्यांनी मेहनत घेतली.