काशिदमध्ये बुडणार्‍या तीन पर्यटकांना वाचवलेल्या जीवरक्षकांचा सत्कार

मुरुड | वार्ताहर |
काशिद समुद्रकिनारी तीन पर्यटकांचे प्राण वाचवल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जीवरक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. रविवारी 9 जनरवारी रोजी काशीद समुद्र किनारी नेहमी प्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. दुपारी 12 वाजून 30 मिनीटांच्या आसपास पुणे येथील कात्रज परिसरातील तीन पर्यटक समुद्रात पोहण्यास गेले असता ते पाण्यात बुडत असताना मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रशांत प्रभाकर लोहार यांच्या सजगतेमुळे जीवरक्षक राकेश रक्ते यांनी दाखवलेल्या धाडसामुळे श्रीकांत ढाके, गणेश प्रकाश पाटील व मुरलीधर सोनावणे हे तिघाजणांना वाचवण्यात यश आले होते.या प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतली असून पोलीस शिपाई प्रशांत लोहार व जीवरक्षक राकेश रक्ते यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे साहेब यांच्या शुभ हस्ते या दोघांना प्रशस्तिपत्रक व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे पोलीस निरीक्षक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version