नैनिता कर्णिक यांना जीवनगौरव पुरस्कार

| कोर्लई | वार्ताहर |

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे पुणे येथे गुणीजन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान नारीगौरव पुरस्कार-2024 वितरण सोहळा सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आला. दरम्यान, मुरुडमधील प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नैनिता नयन कर्णिक यांना राज्यस्तरीय गुणीजनरत्न जीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी संमेलन समारंभाध्यक्ष साहित्यिक विचारवंत डॉ. सुनील सावंत, मार्गदर्शक प्रमुख पाहुणे शामसुंदर सोन्नर महाराज, विशेष पाहुणे शिक्षणतज्ज्ञ मेघा पांडे, इंटरनॅशनल टॅलेन्ट आयकॉन, महासमन्वयक नारायण वाणी, समारंभ संयोजक रवींद्र कापसे उपस्थित होते. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्याध्यापिका नैनिता कर्णिक यांना त्यांच्या सामाजिककार्य, राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत चारोळी स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा यात मिळवलेल्या यशाबद्दल मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरव पदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र स्वरूपात राज्यस्तरीय गुणीजनरत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version