| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील छायाचित्रकार तुषार थळे यांना सर्वद फाउंडेशन मुंबई- महाराष्ट्र यांच्यातर्फे उत्कृष्ट छायाचित्रणासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहिसर, मुंबई येथे विद्याभूषण स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित सर्वद फाउंडेशन मुंबई संस्थेच्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने, रामसिंग राठोड, उद्योजक व अमोल धनेश वर्तक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. थळे अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष असून आजपर्यंत त्यांनी छायाचित्रकार म्हणून भरीव कामगिरी केलेली आहे.