। पुणे । वृत्तसंस्था ।
क्रीडामहर्षि हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना क्रीडामहर्षि हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सोहळा एस.एम.जोशी सभागृहात पार पडला. या सोहळ्यात कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
एअरमार्शल भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कौस्तुभ राडकर यांना क्रीडा पुरस्कार तर पंडीत उपेंद्र भट यांना कला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब साने तर आभारप्रदर्शन सत्यजित साठे यांनी केले.
दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव
