मुंबई स्टार स्ट्रायकर्सची बाजी
| पाली /गोमाशी | वार्ताहर |
वीरशैव नागेश्वर माहेश्वर जंगमआळी गोमाशी आणि साई स्पोर्ट् रायगड वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने प्रथमच कोकण विभागीय मर्यादित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन 11 मे रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख विष्णू पाटील, माजी सुधागड तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र राऊत, सरपंच गोमाशी मंगल जाधव, उमेशस्वामी जंगम, गजानन जंगम, ओम नागेश्वर मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत कोकण विभागातील 8 संघांनी आपला प्रवेश निश्चित केला होता. ही स्पर्धा साखळी पद्धतीने स्पर्धा पार पडली. या स्पर्धेची अंतिम लढत मुंबई स्टार स्ट्रायकर्स विरुद्ध श्री देव सोमेश्वर मठ धामापूर या संघात झाली. या स्पर्धेतील अंतिम विजयी ठरला मुंबई स्टार स्ट्रायकर्स या संघास रोख रक्कम 15 हजार व आकर्षक चषक तर उपविजेता ठरलेल्या धामापूर संघास 10 हजार व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृयीय क्रमांक यंग स्टार रोहा तर चतुर्थ क्रमांकावर जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा या संघास समाधान मानावे लागले. या दोन्ही संघास प्रत्येकी 5 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले .
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू राज जंगम (मुंबई) उत्कृष्ट चढाई पपन लिंगायत (धामापूर), उत्कृष्ट पक्कड शिवम जंगम (मुंबई), पब्लिक हिरो साहिल लिंगायत (साखरपा) या सर्व खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.