लायन्स क्लब अलिबाग ‘सर्व्हिस विक 2021’ चा शुभारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब ऑफ अलिबाग यांच्या ‘सर्व्हिस विक’च्या निमित्ताने स्त्रियांसाठी आणि वयात आलेल्या मुलींसाठी मोफत आरोग्य निदान शिबिर जयश्री हॉस्पिटल, अलिबाग येथे घेण्यात आले. या शिबिरासाठी रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या शिबिराचा लाभ 75 महिला व मुलींनी घेतला. या सर्व 75 महिला व मुलींची आरोग्य तपासणी अलिबागच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मेघा घाटे यांनी केली. या शिबिरामध्ये लायन्स क्लबचे अविनाश राऊळ, सचिव रोहन पाटील, पीएमजे एफ अनिल म्हात्रे, राजेंद्र पाटील, महेश मोघे, रमेश धनावडे, अंकित म्हात्रे, प्रकाश देशमुख, परेश भतेजा, डॉ. महेंद्र घाटे तसेच लायन्स डायमंड क्लब अलिबागच्या अध्यक्ष प्रीतम गांधी, चित्रा, रंजनी पाठक, प्रतिभा पाटील, नीता कणेकर, अर्पणा पाटील तसेच लिओ क्लबचे मयुरेश दळी, सिया सरनाईक, वरुण मोघे, गौरव घरत, ओमकार मालपाणी असे उपस्थित होते. या शिबिरासाठी लायन्स क्लब अलिबाग, अलिबाग डायमंड क्लब, अलिबाग लिओ क्लब तसेच जयश्री हॉस्पिटलचे कर्मचारी व परिचारिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version