। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व लायन्स क्लब अलिबाग-मांडवा आयोजित, संदीप म्हात्रे पुरस्कृत बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सन्मिल सुशील गुरव, पंधरा वर्षांखालील गटात शंतनु पेंडसे, तेरा वर्षांखालील गटात अपेक्षा मारभल यांना प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेत 103 बुद्धिबळ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
झिराड येथील पाठारे क्षत्रिय अष्टागर समाजाच्या तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिरात रविवारी (दि. 24) आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेप्रसंगी लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष मोहन पाटील, अनिल म्हात्रे, नयन कवळे, उपाध्यक्ष बाळकृष्ण कोळी, सचिव हर्षद पाटील, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबागचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, रिजन चेअरमन अरविंद घरत, विद्या नितीन अधिकारी, डीसी डायबेटीस स्कनिंग अमिष शिरगावकर, डीसी कम्युनिटी सर्व्हिस धवल राऊत, सुबोध राऊत, सुमित पाटील, अभिजित गुरव, जितेंद्र ठाकूर, जीएमपी नोडल अधिकारी प्रदीप सिनकर, लायन्स क्लब अलिबागचे महेंद्र पाटील, अॅक्टीव्हिटी कोऑर्डिनेटर अरविंद अग्रवाल, स्पर्धेचे समन्वयक सुशील गुरव, चंद्रशेखर पाटील, राष्ट्रीय पंच अमित कदम, राज्य पंच श्रेयस पाटील, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, साहित्यिक उमाजी केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागतगीत लायन्स क्लब पोयनाडच्या सचिव प्रगती सिनकर यांनी गायिले. उद्घाटनाचे सूत्रसंचालन विवेक तेंडुलकर यांनी केले.
सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरणप्रसंगी खुल्या गटात प्रथम क्रमांक सन्मिल गुरव रु. 2000/- आणि ट्रॉफी, द्वितीय- अविष्कार मारभल रु. 1500/- आणि ट्रॉफी, तृतीय- शुभम नांदगावकर रु. 1000/- आणि ट्रॉफी, चतुर्थ- साई बलकवडे रु. 500/- आणि ट्रॉफी, पाचवा- अभिषेक ई तसेच उत्तेजनार्थ अभिजित गुरव आणि सोफिया घट्टे (महिला विशेष बक्षीस) यांचा सन्मान करण्यात आला.
पंधरा वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक- शंतनू पेंडसे 1500/- आणि ट्रॉफी, द्वितीय- निमिष वाकडे रु. 1000/- आणि ट्रॉफी, तृतीय क्रमांक – प्रथमेश जामगे रु. 500/- आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तेरा वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक- अपेक्षा मारभल 1000/- आणि ट्रॉफी, द्वितीय – अथर्व वाघ 700/- आणि ट्रॉफी, तृतीय- आरोही पाटील 500/- आणि ट्रॉफी, उतेजनार्थ- अनुश्री गुरव आणि रिद्धी शेडगे या सर्वात लहान चार वर्षीय मुलीसह सर्वांचा सन्मान करण्यात आला.
लायन्स क्लब मांडवा बुद्धिबळ स्पर्धेत सन्मिल, शंतनु, अपेक्षाची मोहोर
