| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ऑक्टोबर सेवा सप्ताहात लायन्स क्लब पोयनाडने अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजोपयोगी कार्यांचा डोंगर उभा केला. नुकतेच पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना ना.ना. पाटील हायस्कूल, पोयनाड येथे अल्पोपहार व जेवण देण्यात आले. ऑक्टोबर सेवा सप्ताहात लायन्स क्लब पोयनाडने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमास नोडल ऑफिसर जीएमपी रायगड प्रदीप सिनकर, डिस्ट्रिक चेअरपर्सन मनीष अग्रवाल, अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष विनोेद पाटील, सचिव प्रगती सिनकर, खजिनदार विकास पाटील, तसेच मनोज जैन, रामचंद्र कामथे, दिलीप गाटे, सतीश पाटील, कुशल अग्रवाल, ममता अग्रवाल, मनोहर चवरकर, मृगांता पाटील, कौस्तुभ जोशी, प्रमोद राऊत, अरविंद अग्रवाल, महेंद्र पाटील आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.