तळीये मधील मृत, जखमी आणि बेपत्ता ग्रामस्थांची यादी जाहीर

४२ मृतांमध्ये ७ बालक, १४ वृद्धांचा समावेश
४ बालक आणि २० वृद्धांसह ४२ जण बेपत्ता
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच बेपत्ता आणि जखमी ग्रामस्थांची नावे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यानुसार आता पर्यंत ४२ ग्रामस्थ मृत्युमुखी पडले आहेत तर ४२ ग्रामस्थ अजूनही ढिगाऱ्याखाली बेपत्ता आहेत. तसेच ५ जण जखमी झाले. ४२ मृतांमध्ये ७ बालक, १४ वृद्धांचा तर ढिगाऱ्याखाली बेपत्ता असलेल्या ४२ जणांमध्ये ४ बालक आणि २० वृद्धाचा समावेश आहे.

Exit mobile version