| पनवेल । वार्ताहर ।
पालिका अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य या घटकाचे काम पहिले जाते. या घटकांतर्गत करण्यात सर्वेक्षणात आलेल्या फेरीवाला पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर येऊन पडली आहे.
फेरीवाल्यांची ही समस्या सोडवण्यासाठी व सिडकोने फेरीवाल्यांकरिता राखीव ठेवलेल्या भूखंडावर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेच्यावतीने फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली असून, पालिका हद्दीतीलफेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणान आखून दिलेल्या निकषावर पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर 23 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. पालिकेने या यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी 25 ऑक्टोबर पर्यंत कालावधी देण्यात आल्याची माहिती पालिका अधिकार्यांनी दिली आहे. जवळपास 55 भूखंडांचे हस्तांतरण पालिकेकडे झाले आहे तर काही भूखंडांचे हस्तांतरण पालिकेकडे होणे बाकी आहे. पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या भूखंडावर फेरीवाला धोरणा नुसार पात्र फेरीवल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.