| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई देशातील तृतीय क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात नवी मुंबई नेहमीप्रमाणेच नंबर वन कचरामुक्त शहराचे ‘फाईव्ह स्टार’ मानांकन मिळविणारे शहर असून नवी मुंबई महानगर पालिकेला सातत्याने गौरवण्यात येत आहे. परंतु अजूनही शहरातील नागरिकांसाठी बनवण्यात आलेले जॉगिंग ट्रॅक तसेच विविध भागात असलेले हरित पट्टे या ठिकाणी पाणगळीमुळे सुकलेल्या पानांचे ढीग करून ठेवले जातात. ते दिवसेंदिवस उचलले जात नसल्याने नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे घनकचरा विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नव्याने 2023 स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात झाली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणासाठी स्वच्छता मोहीम सुरू झालेली असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत आणखी बारकाईने लक्ष देण्याची मागणी नागरिक करू लागली आहेत. नवी मुंबई शहरामध्ये बेलापूर ते दिघा या आठ विभाग कार्यालयांतर्गत अनेक उद्याने हरित पट्टे व जॉगिंग ट्रॅक यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु काही भागांमध्ये सुक्या पानांचे हे ढिगारे उद्यानांमध्ये व जॉगिंग ट्रॅकवर अनेक दिवस पडून असतात त्यामुळे या ठिकाणी जाणार जाणार्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.