। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
गव्हाण फाट्याजवळ एका कंटेनरने स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कंटेनरच्या चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितवी तेजस पाटील (रा.अंधेरी) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे आई-वडील रायगडहून येत असताना फाल्कन कंपनी गेट, गव्हाण फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीला पाठीमागून आलेला कंटेनरने धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील सर्वजण खाली पडून पत्नी आणि अडीच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत परागे करत आहेत.







