| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना पुन्हा एकदा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिन्याभरापूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी (दि. 6) पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 96 वर्षीय लालकृष्ण आडवाणी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं सांगण्यात आलं आहे. लालकृष्ण आडवाणी यांच्यावर डॉ. विनीत सुरी लक्ष ठेवून आहेत. मागील महिन्यातही लालकृष्ण आडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील महिन्यात त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 2002 ते 2004 या कालावधीत लालकृष्ण आडवाणी देशाचे उपपंतप्रधान होते. तर 1999 ते 2004 या कालावधीत लालकृष्ण आडवाणी हे देशाचे गृहमंत्रीही होते.