सीएसएमटीजवळ लोकलचा डबा घसरला; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

| मुंबई | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना सोमवारी (दि.29) रोजी सकाळी 11.35 च्या सुमारास घडली. यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. या घटनेमुळे मार्गावरील अनेक लोकल रखडल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक दोनवर पनवेल लोकलचा डबा घसरला. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल मस्जिदपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. तर, काही लोकल वडाळ्यापर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत. यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. वडाळा ते सीएसएमटी स्थानकापर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून रेल्वे सेवा थोड्याच वेळात पूर्णपणे सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Exit mobile version