| उरण | वार्ताहर |
तळोजा मधील सेक्टर नंबर 93, प्लॉट नंबर 31, तळोजा, एम.आय.डी.सी येथील परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड कंपनीला स्थानिकांनी विरोध केला असून त्या अनुषंगाने सदर कंपनीचे सर्व परवानगी रद्द करावे, अशी मागणी मनसेने केलेली आहे. तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी योगेश मस्के यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी चिंतामणी मुंगाजी, संजय तन्ना, रमेश पाटील, विजय ठाकूर, सोनी बेबी, कैलास माळी आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ही कंपनी ज्या जागेत उभारण्यात येत आहे ती जागा ग्रीन झोन होती आणि या जागेत नियमांचे उल्लंघन करून केमिकल झोन करण्यात आले आहे. ग्रीन झोनमधून केमिकल झोन कन्वर्जन करत असताना तळोजा एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण खात्याचे कायद्याचा उल्लंघन करून केमिकल झोन या व्यवस्थापनाने प्राप्त केला आहे. 90 मीटरच्या आत स्थानिक गाव वसाहत आहे. आणि या वसाहत राहणारे 10 हजार लोकांचं जीव धोक्यात आहे. स्थानिक ग्रामस्थांचा, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच नगरसेवक, पुढारी यांचा परफॉर्मन्स केमिसर्वे लिमिटेड या कंपनीला विरोध आहे. या सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या वरील कंपनीला दिलेल्या सर्व परवानग्या त्वरित रद्द करावे. शासनाने योग्य ती त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न केल्यास एम.आय.डी.सी तळोजा व प्रदूषण नियंत्रण एमपीसिबी कार्यालयावर मनसे तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे .