| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा हद्दीतील वडगाव ग्रामपंचायत परिसरात येणार्या वाशिवली ठोंबरेवाडीकडे जाणारी पायवाट ही स्वातंत्र्याअगोदरपासूनच झाडाझुडपांची आहे. या परिसरात आदिवासी, ठाकर, धनगर आदी जमातीचे बांधव राहत असल्याने या वाड्यांकडे जाणार्या रस्त्याकडे कायमच दुर्लक्ष राहिले. हा रस्ता व्हावा अशी मागणी येथील नागरिकांनी सरपंच गौरी गडगे व सदस्यांकडे केली होती. अखेर ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांच्या प्रयत्नातून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाशिवली ठोंबरेवाडी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच गौरी गडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, सदस्य संदीप पाटील, सदस्य संतोष पारिंगे, सदस्य महादेव गडगे, राजेश साळुंखे, तुळशीराम ठोंबरे, जनार्दन बावधने, मधुकर बावदाने, तुकाराम बावधने, संतोष बावधने, धोंडीराम आखाडे, आंबो भला, हशा भळा, मंगेश बावधने, कल्पेश कोकरे, जयेश तुपे, जगदीश म्हात्रे, सतीश ठोंबरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. वाशिवली ठोंबरेवाडी या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी सरपंच गौरी गडगे व सदस्यांचे आभार मानले.