लोकी फर्ग्युसनचा महाविक्रम

। फ्लोरिडा । वृत्तसंस्था ।

न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनने पापुआ न्यू जिनिया संघाविरूद्ध इतिहासच रचला. टी-20 विश्‍वचषकाच्या साखळी सामन्यातच गाशा गुंडाळावा लागलेल्या किवींनी शेवट गोड केला. त्यांनी पीएनजीला 78 धावात गुंडाळले. यात मोलाचा वाटा उचलला तो लोकी फर्ग्युसनने. त्याने 4 षटकात एकही धाव न देता 3 बळी घेतले. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात किफायतशीर गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅनडाच्या साद बिन जफरने 4 षटकात शुन्य धावा देत 2 बळी घेतले होते. तो कॅनडाचा कर्णधार होता.

दरम्यान, पावसाचा फटका बसलेल्या सामन्यात सामन्यात न्यूझीलंडने नवख्या पीएनजी संघाच्या फलंदाजांना चांगलंच दमवले. तरी या नवख्या संघाने 20व्या षटकापर्यंत तग धरला होता. मात्र, 19.4 षटकात न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनियाचा डाव 78 धावात संपवला. लोकी फर्ग्युसनने 4 षटकात शुन्य धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला ट्रेंट बोल्टने आपल्या शेवटच्या सामन्यात 14 धावा देत 2 बळी घेतले. टीम साऊदी आणि इश सोधी यांनी देखील प्रत्येकी 2 बळी घेत चांगली कामगिरी केली.

Exit mobile version