वीज ग्राहकांसाठी लोक अदालत

| कल्याण | वार्ताहर |
कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक, वीजबिलाबाबत वाद व वीज चोरीच्या दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका स्तरावर शनिवारी (11 फेब्रुवारी) आयोजित लोक अदालतीत सहभागी व्हावे लागेल. कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. परिमंडलातील संबंधित ग्राहकांना सकाळी 11 ते दुपारी दोन दरम्यान लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होत आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येईल. संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Exit mobile version