मराठा आरक्षणासाठी आता लाँगमार्च

खासदार संभाजीराजेंचा खोपोलीत इशारा
खोपोली | वार्ताहर |
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची तशी मानसिकता नाही.आरक्षण देण्यासाठी मार्ग निघत नसेल तर मुंबई-पुणे लाँगमार्च आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा खा.छत्रपती संभाजीराजेंनी मंगळवारी (26 ऑक्टोबर) खालापूर तालुक्यातील वावोशी येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खा.संभाजीराजे यांनी जनसंवाद यात्रा सुरु केली आहे.रायगडात या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळीस सकल मराठा समाजाचे रायगड समन्वयक विनोद साबळे, जि.प.सदस्य नरेश पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील,विजय पाटील,आर. एस.पाटील,शंकर माणकवले, करण गायकर, अंकुश कदम, राजेंद्र कोंदे, राजेंद्र गावडे, किशोर पाटील, भूषण पाटील, शेखर पिंगले, खालापूर तालुका सन्वयक शशिकांत मोरे, अशोक मराजगे, महेश पाटील, प्रशांत खांडेकर यांच्यासह अन्य मान्यवर होते.
मराठा अरक्षणा संदर्भात समाज बांधवांनी रान उठवले आणि जवळपास 58 मुख मोर्चे काढले मात्र उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर लगेच सर्व सनमवयकाना एकत्र करीत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा आरक्षणाची क्रांती उठविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा खालापूर तालुक्यातील वावोशी येथून सुरु केली आहे.


मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्याची आणि केंद्राची जबाबदारी काय ? मूलभूत सुविधा कशा सोडवू शकतात यासाठीच जनसंवाद यात्रा असून आमचा कोणाशाही वैयक्तिक विरोध नसून राजकारण विरहीत संघटना स्थापून गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचे आचार विचार राज्यात पोहचविण्यासाठीच रायगडात जनसंवाद यात्रेला प्रारंभ केला आहे.
खा.संभाजीराजे

राज्य सरकारच्या हातातील सारथी,अण्णासाहेब महामंडळ,ओबीसींना शिक्षणाच्या सवलती,2009 साली निवड झाली आहे परंतु कोविडमुळे नियुक्ति करण्यात आली नाही त्या विद्यार्थ्यांची काय चूक अशा अनेक विषयांवर तीन चार महिने चर्चा केल्यावर सारथी सोडून काहीही केलं नसल्याचे आरोप संभाजीराजेंनी राज्यसरकारवर केले आहे. वेळोवेळी मागण्या मांडूनही न्याय मिळत नाही.कोविड काळात इतर स्नेहमेळावे,पक्ष एकत्रित येत सभा कार्यक्रम आणि सणवार होत असतील मराठा समाज शांत न बसता जनसंवाद यात्रा काढून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
या जनसंवाद यात्रेचे पाली फाटा येथे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अंकित साखरे, कर्जत खालापुर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. संतोष बैलमारे आदींनी स्वागत केले.त्यांनतर शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. याठिकाणी ही जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर खोपोली शहरातून मुख्य बाजारपेठतून ताफा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.
यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराक्षा विनिता औटी कांबळे,माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, गटनेते सुनील पाटील, गटनेते मंगेश दळवी, नगरसेविका वैशाली जाधव, प्रमिला सुर्वे, माधवी रिठे, मा. उपनगराध्य रमेश जाधव,शेकाप शहर चिटणीस अविनाश तावडे,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, संतोष मालकर, मधुकर दळवी, निलेश औटी, जयवंत पाटील,हरेश काळे,शिवसेना शहर संघटिका प्रिया जाधव, सुरेखा खेडेकर,भाजपा शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल,सेक्रेटरी हेमंत नांदे, शहर अध्यक्षा शोभा काटे, दिलीप पवार यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version