तटकरेंबद्दल असलेला अविश्वास महायुतीच्या सभेत उघड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आम्ही तुम्हाला मदत करू, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला मदत करा असा टोला आ. भरत गोगावले यांनी लगावला. सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली. त्यांना तटकरेंनी फसविले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आजही सुनील तटकरेंबद्दल विश्वास नसल्याचे समोर आल आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचा हात पकडून सूनील तटकरेंनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तटकरे यांना राज्याचे मंत्री पद देत असताना त्यांच्या घरातचत अन्य मंत्रीपदासह आमदारकी दिल्या. तसेच शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांनीदेखील मागील लोकसभा निवडणूकीत तटकरेंना मदत केल्याने तटकरेंचा विजय झाला. यावेळी माजी आ. मधुकर ठाकूर यांनीदेखील तटकरेंना मदत केली होती. मात्र ज्यांनी ज्यांनी तटकरेंना मोठे केले, त्यांच्याशी विश्वासघात करण्याचे काम तटकरेंनी केल्याची राजकीय चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे या निवडणूकीत शिवसेना, मनसे, भाजपचा हात पकडून उभे राहिलेले महायुतीचे उमेदवार तटकरे विश्वास घातकी असल्याची भीती महायुतीमध्येदेखील असल्याचे समोर आले. या निवडणूकीत तटकरेंना मदत करण्यासाठी महायूतीचे कार्यकर्ते काम करीत असले तरीही ते मनापासून नसल्याचे चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीची सभा गुरुवारी पार पडली. या सभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आ. भरत गोगावले म्हणाले, प्रत्येक आमदार विधानसभा मतदार संघातून तटकरेंना मताधिक्य देण्याची गॅरंटी घेईल. मात्र पुढे सहा महिन्यात येणार्या विधानसभा निवडणूकीत आम्हालाही मदत करावी असे टोला गोगावले यांनी तटकरेंना लगावला. त्यांच्या या बोलण्यावरून तटकरेंबद्दल आजही अविश्वास असल्याचे समोर आले आहे.