। महाड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाजवळ बुधवारी मध्यरात्री चार इसमांनी एका टेम्पो चालकाला शिवीगाळ करून त्याला मारहाण करत त्याच्याकडील 2 हजार रुपये काढून लुटमार केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची सविस्तर हकीगत अशी की शाहीद अली शेख रा. गोवंडी, मुंबई हे आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक एम.एच 48 ए.जी. 8140 ही लाडवली गोंडाळे ते कल्याण असे घेऊन जात असताना महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास एम.एच.01 एफ ए 3033, आणि दुसरा नंबर माहीत नाही अशा दोन मोटार सायकलवरून आलेल्या अमन दीपक बिरवाडकर रा. नवेनगर महाड, पवन दिलीप धोत्रे रा. लाडवली महाड, शाकीबा पूर्ण नाव माहीत नाही रा. लाडवली महाड, तर एक अज्ञात अशा चार लोकांनी या आयशर टेम्पोच्या समोर मोटरसायकल लावून शाहीद शेख यांना शिवीगाळ करत त्याच्या खिशातून 2 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. शेख यांच्या फिर्यादी नुसार महाड शहर पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत
टेम्पो चालकाला मारहाण करुन लूटमार
