म्हाडाच्या चार हजार घरांची लॉटरी

| मुंबई | वार्ताहर |

मुंबईत घरं घेण्याचं स्वप्न पाहणार्‍यांसाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण, दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडानं तयारी सुरु केली आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यामुळे तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरं असतील, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिली.

Exit mobile version