निष्ठावंत कार्यकर्ता हीच खरी माझी ताकद: जयंत पाटील

| पनवेल | प्रतिनिधी |

आज हजारोंच्या संख्येने वर्धापन दिनाच्या सोहळ्यास जमलेले निष्ठावंत कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पक्षाची खरी ताकद दाखवून दिली आहे. एक-दोन कोण गेले म्हणून शेकापक्ष संपला बोलणाऱ्यांना ही मोठी चपराक असून, शेकापक्ष कायचा जिवंत राहणार पक्ष आहे, हे आज तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दाखवून दिले असल्याचा उल्लेख जयंत पाटील यांनी आवर्जून केला.

शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आजचा वर्धापन दिन ऐतिहासिक आहे. कारण, आजवर फक्त पक्षाचीच नेतेमंडळी या वर्धापनदिनी शुभेच्छा देण्यासाठी येत असत. परंतु, आज सर्वपक्षीय नेत्यांनी व्यासपीठावर एकत्र येत एक आगळावेगळा इतिहास घडवला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रासाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. पहिलं महाराष्ट्र, ही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका आहे. नवीन पिढीला माहिती नाही. या महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्र समिती जी स्थापना झाली. त्यावेळेला त्याची पहिली बैठक प्रबोधन ठाकरे यांनी भाऊसाहेब राऊत असताना सांगितले, की तुमच्या घरी बोलवा. मुंबईला भाऊसाहेब राऊतांच्या फणसवाडीमध्ये आणि कोळ्याच्या वाडीमध्ये ही बैठक झाली. आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीची स्थापना झाला. आज प्रबोधन ठाकरे यांचे दोन नातू या ठिकाणी आलेत, शेकापक्षाचा गौरवशाली इतिहास जाणून करुन दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असेही जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version