ल्यूक माँटग्नियर यांचे निधन

। फ्रान्स । वृत्तसंस्था ।
फ्रान्सचे संशोधक ल्यूक माँटग्नियर यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांना एचआयव्ही व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी 2008 साली नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. माँटग्नियर यांनी मंगळवारी पॅरिस उपनगरातील न्यूली-सुर-सीन येथे अखेरचा श्‍वास घेतला. फ्रान्स सरकारने याबद्दल माहिती दिली आहे. माँटग्नियर यांनी एचआयव्ही विषाणू शोधण्यासाठी प्रचंड मेहतन घेतली होती. मात्र, नंतरच्या वर्षांत त्यांनी विज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांना आव्हान देणारे काही प्रयोग करून सहकार्‍यांपासून स्वतःला दूर केले. कोरोना व्हायरस आल्यानंतर ते करोना प्रतिबंधात्मक लसींना जाहीरपणे विरोध करत होते.

Exit mobile version