माधव आग्री यांना पीएचडी प्रदान

। कोलाड । वार्ताहर ।

प्रोफेसर माधव आग्री यांना शनिवार, दि. 31 ऑगस्ट रोजी अंधेरी Galexi Banquete येथे मान्यवरांच्या हस्ते (वॉशिंग्टन विद्यापीठ-युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका) USA या शिक्षण क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.

प्रो.डॉ. माधव आग्री रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील रहिवासी असून, ते सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देत असतात. याशिवाय कुणबी समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. तसेच आपल्या विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण मिळावे यासाठी अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन नेहमीच शैक्षणिक मदतीचा हात देत असतात. तसेच लायन्स क्लब कोलाड रोहाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत. अशा विविध स्थरावर काम करणारे माधव आग्री सर यांना गेल्या वर्षी राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला असून, यावर्षीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन वॉशिंग्टन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

या यशाबद्दल माधव आग्री यांचे कुणबी समाजोन्नती संघ शाखा मुंबई, रायगड, तसेच रोहा तालुक्यातील कुणबी समाजाचे पदाधिकारी व सर्व सदस्य, कोलाड रोहा लायन्स क्लबचे पदाधिकारी सर्व सदस्य, सर्व तांबडी बुद्रुक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version