। चणेरा । प्रतिनिधी ।
अंधारआळी येथील मधुकर हरी जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते वय 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त झाली. रोहा शहरातील सेवाभावी तरुण आणि रोहा सिटीझन फोरमचे दिनेश जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह त्यांचे आप्तस्वकीय व मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून, त्यांचा तेरावे धार्मिक कार्य विधी गुरुवार, दि.15 रोजी रोहा अंधारआळी येथील निवास्थानी होणार आहेत.