शिवाई बांधण विजयी
| सोगाव | अब्दुल सोगावकर |
अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे स्व.माजी आ. मधूशेठ ठाकूर स्मृती चषक 2024 च्या जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ, वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय खुल्या गट कबड्डी स्पर्धांचे रविवारी (दि. 11) अनुसया दत्ताराम पाटील क्रीडानगरी, जय हनुमान क्रीडा मंडळ वायशेत येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उद्घाटन प्रभाकर राणे यांच्याहस्ते व सुनिल थळे, विराज निवास भगत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कबड्डी स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव अॅड. प्रविण ठाकूर, अलिबाग नगरपरिषद माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सातिर्जे ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश ठाकूर, समीर(उनी) ठाकूर, आमिर ठाकूर, प्रशांत गावंड, पिंट्या गायकवाड, जगन्नाथ पेढवी, राकेश पाटील, मिलिंद पडवळ, अॅड प्रसाद पाटील, अॅड अनंत पाटील, जगदीश पाटील, अजित म्हात्रे, डॉ. कैलास चेऊलकर, डॉ. सुभाष म्हात्रे, अशोक नाईक, समीर पाटील, मनोहर म्हात्रे, महेश पडते, शिवप्रसाद तोडणकर, विजय आंबेतकर, दिलीप धुमाळ, विश्वनाथ पाटील, सचिन घाडी, मिलिंद पाटील, प्रफुल्ल पाटील, जगदीश बारे, अजय म्हात्रे, राजु शिंदे, अवधुत नाईक, महेंद्र पाटील, मुरतुज मुजावर, संतोष हाके, विकास काटे, शैलेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामना शिवाई बांधण विरुद्ध ओमकार वेश्वी या संघामध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवाई बांधण संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर ओमकार वेश्वी संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत तृतीय क्रमांक दर्यावर्दी बंदर नागाव, मातृछाया कुर्डूस संघाने चतुर्थ क्रमांक पटकावले. उत्कृष्ट पकड म्हणून दर्यावर्दी बंदर नागाव संघाचा मंथन सुर्वे, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवाई बांधण संघाचा राज जंगम याला सन्मानित करण्यात आले. पब्लिक हिरो म्हणून ओमकार वेश्वी संघाचा अनुराग सिंग याला गौरविण्यात आले. मनोहर पाटील, द्वारकानाथ पाटील, दत्ताराम पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंना वजनी बोकड पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन संजय पोईलकर, संजय म्हात्रे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ वायशेतच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच, वायशेत ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली.