| कोर्लई | वार्ताहर |
ग्रामीण दुर्गम भागात असलेल्या मुरुड तालुक्यातील मजगांव-वेळास्ते रस्त्याची पार दुर वस्था झालेली असून रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच संदीप गोणबरे यांनी केली आहे. मजगांव-वेळास्ते हा साडे पाच कि.मी.लांबीचा रस्ता सन.2014 मधे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळ संस्था-रायगड तयार करण्यात आला होता. हा रस्ता तयार करण्यात आला होता. तदनंतर या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील महिन्यात पडलेल्या जोरदार पावसाने रस्ता खराब होऊन खाचखळगे व खड्ड्यामुळे दुरावस्था झाली आहे .यंदा मागील महिन्यात पडलेल्या पावसाने मजगांव-वेळास्ते रस्त्यावर मजगांव मराठी शाळा, वाकीचा पाडा, तलावा लगतच्या रस्यावर खाच खळगे व खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व आजारी रुग्णांना त्रास व हाल सहन करावे लागत आहेत. वेळास्ते दुर्गम ग्रामीण भाग असुन रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी.ची सुविधा मिळत नाही. शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने दुर्गम ग्रामीण भागातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मजगांव-वेळास्ते रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच संदीप गोणबरे यांनी केली आहे.