| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महानगर पालिकेकडून अतिवृष्टीमुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अळ्या असलेला नाश्ता महानगर पालिकेकडून देण्यात आल्याने रहिवाशी संतप्त झाले होते. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नविन पनवेल येथील सेक्टर 1/S आंबेडकर भवन येथे पूरग्रस्त स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाष्ट्यात अळ्या मिळाल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यावेळी तेथील रहिवाश्यांनी संताप व्यक्त करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी पनवेल महानगर पालिकेला किती आहे. हे आजच्या देण्यात आलेल्या नास्त्यावरून दिसून येत असून, संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाश्त्यामध्ये अळ्या
