लायन्स क्लब मांडवातर्फे महाआरोग्य शिबीर

शिबिरात 300 जणांची तपासणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त लायन्स क्लब मांडवा, ग्रुप ग्रामपंचायत झिराड, लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.7) प्राथमिक शाळा, झिराड येथे मोफत महाआरोग्य तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 300 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लायन्स क्लब मांडवाची ऑक्टोबर सेवासप्ताहानिमित्त सामाजिक उपक्रमांची घोडदौड सुरु आहे. त्या अतर्गत हे महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष अभिजीत गुरव, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, जीएसटी कोऑर्डिनेटर प्रवीण सरनाईक, लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनचे चेअरपर्सन अरविंद घरत, नयन कवळे, झोन चेअरपर्सन विद्या अधिकारी, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, खजिनदार सतीश म्हात्रे, सुमीत पाटील, चंद्रकांत मल्हार, विजयराव देशमुख, बाळकृष्ण कोळी, वैभव म्हात्रे, हर्षद पाटील, हेमलता घरत इतर लायन्स सदस्य, दर्शना भोईर, सुजाता माने, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी या महाआरोग्य शिबिरामागची भूमिका स्पष्ट केली, तर जीएसटी कोऑर्डिनेटर प्रवीण सरनाईक सोगाव येथे उभारल्या जात असलेल्या डोळ्यांच्या स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत माहिती दिली.

या महाआरोग्य शिबिरात डॉ. राजाराम हुलवान, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. राहुल शर्मा, डॉ. तेजस सिद्धापूर, डॉ. शाहिदा अन्सारी, डॉ. केतन ढोकळ, डॉ. पूजा साळुखे, डॉ. संदेश धाणेकर, डॉ. शुभदा कुडतलकर आदी डॉक्टरवृंदाने रुग्णांची आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी कोरोना रेमिडी प्रा.लि., तर्फे हाडांची घनता तपासणी आणि लायन्स पॅथॉलॉजी लॅब तर्फे रक्त तपासणी करण्यात आली. एकूण 300 रुग्णांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. यात 30 जण मोतीबिंदू रुग्ण व एकास रेटिना रोग असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर ग्रुप ग्रामपंचायत झिराड, लायन्स क्लब मांडवा, लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने मोफ्त शस्त्रक्रिया होणार आहे.

Exit mobile version