। महाड/ तळीये । भारत रांजणकर ।
महाडा तालुक्यातील तळीयेत घरांवर दरड पडली. या घटनेत वाचलेल्या प्रतिभा निलेश कोंढाळकर यांनी त्यावेळची परिस्थिती सांगितली. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी क्षणाचाही विलंब न करता 6 वर्षीय मुलीचा जीव वाचविला.
यावेळी त्यांनी सांगितले कि, घरात आपल्या 6 वर्षीय मुलीसोबत असतानाच डोंगराचा मोठा आवाज आला. त्या भयंकर आवाजाने घाबरुन गेल्यामुळे मुलीला घेवून जीव वाचवण्यासाठी गावाबाहेर पळण्यास सुरुवात केली. गावाच्या वेशीबाहेर येईपर्यंत संपूर्ण गाव किंकाळ्या अन् आक्रोशासोबत गायब होत असताना पाहून हृदयाचा थरकाप उडाला.
तिथून जवळच असलेल्या मामाच्या घरी जावून आसरा घेतला. माझ्यासह मुलगी रित्वी व पती निलेश कोढाळकर यांचा जीव वाचला असला तरी पतीचे आई-वडील, चुलते, चुलती यांचे मरण मात्र डोळ्यांनी पाहताना डोळे थिजून गेले.