महड देवस्थानालाही पुराचा फटका

मंदिराचा सर्व परिसर जलमय; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

| खोपोली | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता खालापूर तालुक्यातील महड देवस्थानालाही बसला आहे. सततच्या पावसामुळे मंदिर परिसरात पुराचे पाणी शिरले असून, परिसरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूरस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून महड देवस्थान भाविकांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना परतावे लागत असून त्यांची गैरसोय होत आहे. मंदिर परिसरासह गावातील सखल भागांतही पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, नागरिकांनी व भाविकांनी विनाकारण पूरग्रस्त भागात जाऊ नये, नदी-नाल्यांच्या परिसरापासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.

Exit mobile version