महड मंदिर भाविकांना खुले

। खोपोली । प्रतिनिधी ।
कोरोना संसर्ग निर्बंधामुळे बंद मंदिराचे दरवाजे घटस्थापनेच्या दिवशी भक्तांना उघडण्यात आल्याने आनंदाचे वातावरण असून पहाटे पासून भाविक, दर्शनासाठी येत होते.
कोरोना संसर्गाची संभाव्य दसर्‍या लाटेत फेब्रुवारीत गणेश जन्मोत्सव नंतर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. मंदिर परिसरात असलेल्या सुमारे दिडशे छोट्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. त्यात संभाव्य तिसर्‍या लाट यामुळे मंदिर कधी उघडणार याची शाश्‍वती नसल्याने दुकानदार, पुजारी यांची चिंता वाढली होती. परंतु घटस्थापनेच्या दिवशी चिंतामणी बाप्पा नी चिंता दूर केल्याची भावना पुजारी मंदार जोशी यांनी व्यक्त केले. गुरुवारी पहाटे साडेसहाला मंदिर व्यवस्थापक बडगुजर, मुख्य पुजारी आणि भाविकांच्या उपस्थित मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला. यावेळी मास्क, सॅनिटाइजर आणि सामाजिक अंतर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन महड देवस्थान कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी केले आहे.

Exit mobile version