| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मोहोपाडा येथील महावितरण कर्मचार्यांस मारहाण केल्याप्रकरणी ग्राहकावर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोपाडा कार्यालायांतर्गत विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अतुल चतरकर विद्युत सहाय्यक अर्पण इंगळे यांच्यासोबत तळेगाव येथे ग्राहकांची थकबाकी वसुली करण्याकरिता गेले असता त्यांना वीज बिलधारक रामचंद्र पाटील, त्यांचा मुलग्याने मारहाण केली. पाटील यांचे एका महिन्याचे वीजबिल थकीत असल्याने वसुलीसाठी त्यांच्या घरी गेले होते. इंगळे यांनी त्यास बिल भरण्यास सांगिले. सदर इसमाने अर्पण इंगळे यांना विनाकारण शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. त्यावेळी अतुल चतरकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये शुटींग केली असल्याने रामचंद्र पाटील व त्यांचा मुलगा चतरकर यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतले व शुटींग डिलीट करण्यास सांगितले. चतरकर यांनी शुटींग डिलीट करण्यास नकार दिल्याने, रामचंद्र पाटील, त्यांचा मुलगा व तेथील उभा असलेल्या एका इसमाने त्यांनासुद्धा शिवीगाळ, दमदाटी करून हाताबुक्याने मारहाण केली व श्री.अर्पण इंगळे यांच्या अंगावर धावून त्यांना उद्या गावात ये तुझे या दांडक्याची उपट घालतो असे बोलले असता श्री.इंगळे तेथून निघून गेले. चतरकर यांनी आपले वरिष्ट किशोरकुमार पाटील यांना फोनवर सर्व घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. पाटील यांच्या सोबत जाऊन घडलेल्या प्रकाराबाबत रामचंद्र पाटील त्यांचा मुलगा व तेथील एका इसमा विरुद्ध तक्रार करून गुन्हा दाखल केला