। माणगाव । वार्ताहर ।
कवी कालिदास यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गोरेगांव कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने गोरेगाव येथे कवी कालिदास यांच्या काव्यावर आधारित शाखेचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नंदकुमार मराठे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान व सदस्य नागेश नायडू यांच्या गझलांचे सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधक्ष सुधीर शेठ, अजितकुमार जंगम, पंचशिल बौद्धजन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विकास गायकवाड, जिल्हा प्रतिनिधी मंदार म्हशेळकर, केदार खुळे, गंगाधर साळवी, अजित शेडगे यांच्यासह कोमसाप गोरेगावचे सदस्य उपस्थित होते.







