| रसायनी | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती खालापूर व ग्रुप ग्रामपंचायत वासांबे- मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभागृहात महापंचायत राज अभियान राबविण्यात आले.
यावेळी सरपंच ताई पवार,उपसरपंच माधुरी जांभळे, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे, ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे उपस्थित होते. यावेळी वारस नोंदणी करणे, पती/पत्नी यांची संयुक्तपणे घराला नावे लावणे, जॉबकार्ड काढणे, ई- श्रम कार्ड काढणे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नोंद करणे, जनधन योजना खाते उघडणे याचा लाभ नागरिकांना देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी महापंचायत राज अभियानाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती.यावेळी उपस्थित नागरिकांना त्या त्या योजनेचे स्मार्टंकार्ड वाटप करण्यात आले.सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच माधुरी जांभळे, ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांच्या सह ग्रामपंचायत कमिटीने अथक परिश्रम घेतले.