। मुंबई । प्रतिनिधी ।
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) नामांकित उद्योगांकरिता ऊर्जा लेखापरीक्षण सेवा पुरविण्याचे योजित आहे. अशा ऊर्जा लेखापरीक्षण गटांच्या स्थापनेकरिता पात्र ऊर्जा लेखापरीक्षक (एनर्जी ऑडिटर)/ऊर्जा व्यवस्थापक (एनर्जी मॅनेजर) ची आवश्यकता आहे. तसेच महाप्रित एनर्जी ऑडिटर आणि एनर्जी मॅनेजर परीक्षेला बसणार्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवित आहोत. एनर्जी ऑडिटर आणि एनर्जी मॅनेजर यांना सहाय्य करण्यासाठी आयटीआय (विद्युत/यांत्रिकी समकक्ष) पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे.
अनुसूचित जातीच्या इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी http://mahapreit.in qH$dm https://mpbcdc.maharashtra.gov.in/ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाप्रितच्यावतीने करण्यात आले आहे.