रिक्षा चालक-मालक संघटनेची महापूजा

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरातील अ‍ॅपे रिक्षा चालक-मालक संघटनेची सत्यनारायणाची महापूजा गुरुवारी (दि.2) आयोजित करण्यात आली होती. 80 सदस्य संख्या असलेल्या अ‍ॅपे रिक्षा चालक मालक संघटनेच्या पूजेचे यंदा पाचवे वर्ष असून हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम बांधवांचा सहभागदेखील मोठ्या प्रमाणावर होता. पूजेच्या निमित्ताने शहरातील नागरिकांना हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले.

यावेळी संघटनेतर्फे शहरातील प्रमुख मान्यवरांचा व तालुक्यातील पत्रकारांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, रात्री 8.30 वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अलिम पठाण, सुधिर वाघरे, शशिकांत सकपाळ, विशाल मुकणे, रामदास तळकर, सल्लागार अ‍ॅड चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version