महाराष्ट्राला स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।
स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट 2021 मध्ये महाराष्ट्राने ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’चा एक भाग म्हणून 18 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणार्‍या समारंभात महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी’ प्रदान करण्यात येणार आहे.
स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन,अर्थ,बँकिंग,तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 18 जून रोजी सिल्व्हर ओक हॉल, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
महापारेषणने ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी केला आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन कढङड कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. मोनोपोल मनोर्‍यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वहिवाट मार्ग समस्या कमी करण्यासाठी व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
कतऊउ योजना अंतर्गत एकूण 129546 कृषीपंप ऊर्जान्वित केले. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत एकूण 99744 कृषीपंप बसविण्यात आले. 24 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे 12102 घरगुती वीजजोडणी देण्यात आली.
कोरोना काळात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व दिनेश वाघमारे यांनी सातत्याने ऊर्जा कंपन्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शक सूचना केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला.

Exit mobile version