राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही ?

| मुंबई | वृत्तसंस्था |

राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. तब्बल 36 दिवस सरकार स्थापन होऊन झाले तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला नाही. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली. मात्र तरीही विस्तार लांबणीवर पडला आहे, कोर्टाच्या निर्णयानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला का घाबरत आहात असा सवाल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विचारला आहे त्याचं कारणही तसेच आहे कारण सरकार येऊन 36 दिवस झाले तरीही नव्या सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे कोर्टाचा निर्णय झाल्यानंतरच विस्तार होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

शिवसेना बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या ८ तारखेला यावर सुनावणी होईल. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जातं की आणखी काही निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे पण त्यानंतरच विस्तार होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आज होईल उद्या होईल, दोन दिवसात होईल तीन दिवसात होईल अशा अनेक डेड लाईन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून भाजपच्या नेत्यांनी जाहीर रित्या दिल्या होत्या. परंतु अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त का मिळत नाही या प्रश्नाचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही. कदाचित कोर्टाच्या निकालानंतरच याचे उत्तर मिळू शकेल.

Exit mobile version