जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

पीएनपी वेश्वी संकुलनात ध्वजारोहण

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र दिनानिमित्त पीएनपी वेश्वी संकुल येथे पीएनपी कॉलेजचे संचालक, एच.आर. विक्रांत वार्डे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, होली चाईल्ड सी. बी. एस. ई. स्कुलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्कुल वेश्वीच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, बी एड. महाविद्यालयाचे प्रा. हृतिषा पाटील, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‌‘भारत माता की जय’चा जयघोष

मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात नगराध्यक्षा आराधना दांडेकर, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत व मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर महाराष्ट्र राज्य गीत गाण्यासाठी धुन वाजविण्यात आली. महाराष्ट्र दिनाचा विजय असो, वन्दे मातरम्‌‍, भारत माता की जयचा जय घोष करण्यात आला.


यावेळी नगराध्यक्षा आराधना दांडेकर, उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, मुख्याधिकारी-सचिन बच्छाव, नगमाना खानजादे, सुगंधा मकु, बांधकाम यास्मिन कादिरी, पांडुरंग आरेकर, आदेश दांडेकर, मनोज भगत, प्रांजली मकु, प्रिती चौलकर, प्रमिला माळी, श्रध्दा अपराध, नंदकुमार आंबेतकर, सतेज निमकर, अनिकेत जगदाळे, अनिकेत भोसले, अनिकेत वाजे, प्रकाश आरेकर, अशोक सबनीस, गजानन भुसाणे, नैनिता कर्णिक, व सर एस ए हायस्कूलच्या विद्यार्थी आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने
उपस्थित होते.


महाराष्ट्र दिनानिमित्त अलिबागमधील पोलीस परेड मैदानावर बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले. (छायाचित्र : समीर मालोदे)

गोगावलेंच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने राज्याचे कॅबिनेटमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते महाड विभागीय शासकीय ध्वजवंदन करण्यात आले.

याप्रसंगी पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर, महाडचे प्रांत अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाड शहर पोलीस निरीक्षक भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, महाडचे व्यापारी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव, महाडकर, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version