नाना पाटील संकुलामध्ये महाराष्ट्र दिनाचा सोहळा

। पेझारी । वार्ताहर ।
को. ए.सो. नारायण नागू पाटील संकुलामध्ये म 62 वा महाराष्ट्र दिनफ सोहळा माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाधान भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी, आरएसपी, गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिल्यानंतर शाळा समिती ज्येष्ठ सदस्य यशवंत पाटील गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, पोल्ट्री उद्योजक सुरेश म्हात्रे, अांबेपूर सरपंच सुमना पाटील, को. ए. सो. सहमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक गावडे, शाळा समिती सदस्य स्वप्नील पाटील, राजाभाऊ हलदवणेकर, संकुल प्रमुख के. के. फडतरे, डॉ दिलीप पाटील अंबेपुर ग्रामपंचायत सदस्य, मॉर्निंग ऑफ ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे व इतर सदस्य, पोयनाड पंचक्रोशीतील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते शिक्षण प्रेमी नागरिक, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, माजी आणि आजी विद्यार्थी वर्ग असा मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
याप्रसंगी राजेंद्र म्हात्रे व प्रकाश गोलीपकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कलापथकाने राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व महाराष्ट्र गौरव गीत सादर केले पुढे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या ची माहिती सांगितली. यानंतर सन्मा. पंडित शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पोल्ट्री उद्योजक सुरेश म्हात्रे यांनाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर को. ए. सो. पिरोज बाई बारीया प्राथमिक शाळेच्या चेअरमन डॉ. चित्रा पाटील यांना जागतिक स्तरावरील मनेल्सन मंडेला पीस अवॉर्ड पुरस्कारफ मिळाल्याबद्दल तसेच सामाजिक कार्य क्षेत्रातील मानद डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा संकुलात तर्फे सत्कार करण्यात आला. यानंतर ई. 5वी ते 11 वी विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाचा आढावा घेत इयत्ता पाचवी ते अकरावी मधून गुणानुक्रमे तीन आलेल्या 1)म्हात्रे राजेश राजेश( अकरावी शास्त्र)2) पाटील सावरी महेश (आठवी अ) आणि तृतीय देशमुख पायल सतीश (नववी अ) यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यानंतर संकुलातील पाच सेवक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि पुढील सेवानिवृत्ती आयुष्य आरोग्यदायी जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये श्री विकास दत्तात्रय पाटील (सत्र प्रमुख दुपार सत्र) को. ए.सो. मधील 33 वर्षे आठ महिने एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले . त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार.
श्री प्रकाश पांडुरंग पाटील एमसीवीसी शाखेतील बँकिंग विभागात तीस वर्षे सेवा योगदानाबद्दल सपत्नीक सत्कार . .
श्री प्रकाश वसंत गोलीपकर तबलजी म्हणून तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा सपत्नीक सत्कार तसेच कनिष्ठ लिपिक कनिष्ठ महाविद्यालय पोयनाड चे श्री शांताराम धर्मा पाटील 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचाही हे सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच पिरोज बाई बारीया प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा मिलिंद हलदवणेकर या एकूण 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यांचाही यथोचित सत्कार या वेळी करण्यात आला, आणि भावी आयुष्यासाठी सेवानिवृत्ती आयुष्यासाठी शुभेच्छा आरोग्यदायी जावो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्री. विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व को. ए. सो. चे पदाधिकारी सर्व उपस्थित मान्यवर, सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सायली शिरीष पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र पाटील , शशिकांत पाटील, तृप्ती पिळवणकर, सुवर्णा पाटील, अविनाश पाटील, उदय पाटील, संजय डोंगरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version